कोल्हापूर

अंबाबाई मंदिरातील पगारी पुजारी भरती प्रक्रिया बेकायदेशीर; कृती समितीचा आक्षेप...

John Smith
Jun 19 / 2018

कोल्हापूर : श्री अंबाबाई मंदिरात सुरु असलेल्या पगारी पुजारी भरती प्रक्रियेवर करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर पुजारी हटाव कृती समितीने आक्षेप घेतला आहे. ही भरती प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचा आरोप करीत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती बरखास्त करण्याची मागणी कृती समितीचे डॉ. सुभाष देसाई आणि दिलीप देसाई यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केली. याबाबत हक्कभंगाची कारवाई करण्याची मागणी देखील राज्यपालांकडे पत्राद्वार केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.