कोल्हापूर

परीचारिकांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा

MahaNews LIVE
Jun 11 / 2018

कोल्हापूर : जिल्हा परिषदच्या प्राथमिक व उपकेंद्रात काम करणाऱ्या आरोग्य परीचारिकांना जिल्हा परिषदेच्या चतुर्थश्रेणी कामगारांप्रमाणे सर्व सेवा सुविधा देण्यात याव्यात. यासह अन्य मागण्यांसाठी करवीर कामगार संघ ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक) संलग्न यांच्यावतीने जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि उपकेंद्रांमध्ये गेली चाळीस वर्षांपासून अनेक परिचारिका निस्वार्थीपणे सेवा बजावत आहेत. मात्र परिचारिकांना केवळ बाराशे रुपये इतकेे मानधन दिले जात आहे. सध्याची वाढती महागाई लक्षात घेता, परीचारिकांना जिल्हा परिषदेकडील चतुर्थश्रेणी कामगार प्रमाणे शासनाच्या सर्व सेवा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. 2017 मध्ये जाहीर झालेल्या मानधनवाढीच्या परिपत्रकाची अंमलबजावणी करावी. मानधनाची रक्कम वेळेत देण्यात यावे, आरोग्य परिचारिकांचे मानधन बँकेत जमा करण्याची सुविधा करण्यात यावी. लसीकरणाबाबत सक्ती करू नये, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी कॉ. दिलीप पवार, कॉ. सुशीला यादव,कॉ. एस. बी. पाटील, कॉ. बाळासाहेब पवार, कॉ.निर्मला शिंदे, बाळाबाई कांबळे, निर्मला परीट यांच्यासह परिचारिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

परीचारिकांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा
-
W
  • jjjjjj Reply
    2018-06-21 16:14:59

    erwrewrwerew

Your Mobile will not be published. Required fields are marked *