पुणे

महाराष्ट्रात पुढील आठवडा पावसाविनाच राहणार; हवामान विभागाचा अंदाज

MahaNews LIVE
Jun 16 / 2018

पुणे : महाराष्ट्राला चांगल्या पावसासाठी अजून आठवडाभर वाट पाहावी लागणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या आठवड्यातही महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाने हजेरी लावलेली नाही.महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झाल्यानंतर कोकणासह दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागामध्ये पावसाने हजेरी लावली होती. मात्र यंदा मान्सून वेळेत दाखल झाला तरी त्याचा जोर कायम राहिला नाही.त्यामुळे पेरणीच्या तयारीत असलेल्या बळीराजाच्या चिंतेत आणखीनच वाढ झाली आहे. सामान्यत: 15 जूनपर्यंत पश्चिम आणि मध्य भारतात मान्सून दाखल झालेला असतो. परंतु 11 जून पासून मान्सूनच्या वाऱ्यांचा प्रभाव कमी झाला आहे.कोकण आणि गोव्यात तुरळक पाऊस होऊ शकतो. मात्र पुढील आठवडाभर महाराष्ट्रातील अन्य भागात पावसाची कोणतीही शक्यता नाही, असं हवामान खात्याच्या पुणे विभागाकडून सांगण्यात आले आहे.

महाराष्ट्रात पुढील आठवडा पावसाविनाच राहणार; हवामान विभागाचा अंदाज
Categories : पुणे Tags : पुणे
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *