कोंकण

निरंजन डावखरे यांच्या पाठिशी शिक्षक संघटना

MahaNews LIVE
Jun 17 / 2018

ठाणे, दि. 16 (प्रतिनिधी) : कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजप व रिपब्लिकन पक्ष (ए) आघाडीचे उमेदवार अॅड. निरंजन डावखरे यांना कोकणातील विविध शिक्षक संघटनांकडून उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. गेल्या सहा वर्षांमध्ये शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न सोडविण्याबरोबरच ते मार्गी लावण्यात पुढाकार घेतल्यामुळे शिक्षकांकडून पसंती मिळत आहे. कोकण विभागाचे माजी शिक्षक आमदार रामनाथ मोते, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे प्रांत अध्यक्ष वेणूनाथ कडू, महाराष्ट्र स्वाभिमान शिक्षक संघाचे संस्थापक किसन कथोरे, माजी आमदार शिवाजीराव पाटील यांचा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, अखिल भारतीय शिक्षक परिषदेची रत्नागिरी शाखा, मुप्टा महाराष्ट्र मराठी शाळा शिक्षक संघटना, अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघ आणि महाराष्ट्र राज्य कला क्रीडा व कार्यानुभव शिक्षक संघाने पाठिंबा जाहीर केला आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी बजाविलेल्या कामगिरीबद्दल पाठिंबा देत असल्याचे संघटनांकडून पत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. शिक्षकांच्या वेतनासाठी ऑनलाईन पद्धत, भविष्य निर्वाह निधी व सर्व्हिस बूक रेकॉर्ड ऑनलाईन, शालेय वेतनप्रणाली, पीएफ स्लीपा, थकीत वेतनबिले, वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीची प्रकरणे, तुकड्यांच्या अनुदानाचा प्रश्न, पदवीधर शिक्षकांचे वेतनप्रश्न, नवीन शिक्षक भरती, शिक्षक अनुकंपा प्रकरणे आदी कामे होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. शिक्षकांच्या विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी ते सातत्याने सरकारकडे दाद मागत होते. यंदा शालार्थ प्रणालीत तांत्रिक बिघाड झाल्यानंतर अॅड. निरंजन डावखरे यांनी तातडीने सरकारकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर सरकारने ऑनलाईन वेतन करण्यास मंजुरी दिली होती. त्यामुळे वेतन रखडलेल्या हजारो शिक्षकांना दिलासा मिळाला होता. डावखरेंच्या प्रयत्नाने सेवानिवृत्तांना त्रिस्तरीय वेतनश्रेणी  गेल्या काही वर्षांपासून सेवानिवृ्त झालेल्या शिक्षकांच्या त्रिस्तरीय वेतनश्रेणीचा प्रश्न रखडला होता. याबाबत शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर त्रिस्तरीय वेतनश्रेणी लागू करण्यास सरकारने संमती दिली होती. त्याबद्दल शिक्षक संघटनांकडून आभार मानण्यात आले. ---------------------------

निरंजन डावखरे यांच्या पाठिशी शिक्षक संघटना
Categories : कोंकण Tags : कोंकण
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *