पुणे

पुण्यात १५ कुत्र्यांचा संशयास्पद मृत्यू

MahaNews LIVE
Jun 18 / 2018

पुणे : तब्बल १५ कुत्री मृत्यूमुखी पडल्याची धक्कादायक घटना पुण्यातील हडपसर भागात घडली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने कुत्र्यांचा अचानक मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.मृतावस्थेत सर्व कुत्री आढळून आल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. नागरिकांनी माहिती ताबडतोब हडपसर पोलिसांना दिली. सर्व मृत कुत्री पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आली आहेत.कुत्र्यांचा हा मृत्यू नैसर्गिक नसून कोणीतरी खाण्यातून विष देऊन हे कृत्य केलं असावं अशी शंका व्यक्त केली जात आहे.

पुण्यात १५ कुत्र्यांचा संशयास्पद मृत्यू
Categories : पुणे Tags : पुणे
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *