थोडक्यात महत्वाचे

येत्या २३ जूनपासून प्लास्टिक वापरल्यास भरावा लागणार ५००० रुपयांचा दंड!

MahaNews LIVE
Jun 19 / 2018

मुंबई : जर का तुमच्या हातात प्लास्टिकची पिशवी दिसली तर तुम्हाला तब्बल ५००० चा दंड भरावा लागणार आहे. कारण येत्या २३ जूनपासून महाराष्ट्रभरात प्लास्टिक बंदीची कडेकोट अंमलबजावणी सुरु होईल. यामध्ये प्लास्टिक पिशव्यांसोबतच ज्याचा पुर्नवापर होऊ शकत नाही असे प्लास्टिक वापरणाऱ्यांवर कारवाई होणार आहे. मुंबई शहर आणि उपनगरांत प्लास्टिकमुळे होणारा वाढता कचरा आणि प्रदूषण पाहता बंदी असलेले प्लास्टिक वापरणाऱ्या मुंबईकरांविरोधात महापालिका कठोर कारवाई करणार आहे. यामध्ये सर्व दुकानदार, फेरीवाले, मॉल्स, हॉटेल, हॉस्पिटल यांचा समावेश असेल. या सर्व आस्थापनांकडे बंदी असलेले प्लास्टिक आढळले तर त्यांना पाच ते वीस हजारांपर्यंतचा दंड होऊ शकतो. तसंच, जर सर्वसामान्य जनतेच्या हातात बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या आढळल्या तर त्यांनाही ५००० पर्यंतचा दंड करण्याची तरतूद आहे.

येत्या २३ जूनपासून प्लास्टिक वापरल्यास भरावा लागणार ५००० रुपयांचा दंड!
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *