कोल्हापूर

निवडणुक आयोगाप्रमाणे मतदार पुनरिक्षण कार्यक्रम

MahaNews LIVE
Jun 19 / 2018

कोल्हापूर, दि. 19 : भारत निवडणुक आयोगाने दि. 1 जानेवारी 2019 या अहर्ता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदार यादयांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम करण्यात आलेला आहे. सर्व नागरिकांनी आपली नावे मतदार यादीत असल्याबाबतची खात्री करण्यात यावी. मतदार नागरिकांनी आपले आवश्यकतेनुसार आपला नमुना क्रमांक 6, 7, 8, व 8-अ चे अर्ज आपल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) किंवा तालुक्यातील तहसिलदार कार्यालय (निवडणुक शाखा) यांच्याकडे तसेच आयोगाने विकसित केलेल्या www.nvsp.in या संकेत स्थळावर ऑनलाईन पद्धतीने कागदपत्रासहीत सादर करावे. आयोगाच्या ऑनलाईन संकेतस्थळावरुन नमुना क्रमांक 6, 7, 8, व 8-अ हे नमुना फॉर्म सादर करताना मतदारांकडून मतदार संघाचे नाव, यादी भाग क्रमांक व अनुक्रमांक चुकीचे नमुद केले जात असल्याने सदर अर्ज मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडून नामंजूर करण्यात येतो. मतदारांनी नमुना क्रमांक 6 सादर करताना आपला मतदार संघाचे नाव अचूक निवड करण्यासाठी व नमुना क्रमांक 7,8, व 8-अ हे सादर करताना मतदार संघाचे नाव, यादी भाग क्रमांक व अनुक्रमांक अचूक नमुद करणे आवश्यक आहे. तसेच रंगीत छायाचित्र, वय वर्षे व पत्ता इत्यादी पुराव्यासंबंधी अधिकृत कागदपत्र आवश्यक आहेत. असे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणुक अधिकारी यांनी केले आहे.

निवडणुक आयोगाप्रमाणे मतदार पुनरिक्षण कार्यक्रम
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *