कोल्हापूर

पूर्ववैमनस्यातून तरुणावर विळ्याने हल्ला

MahaNews LIVE
Jun 19 / 2018

कोल्हापूर : कळंबा येथील कात्यायनी पार्कमध्ये तरुणावर पूर्ववैमनस्यातून विळ्याने हल्ला करण्यात आला. त्याच्या हल्ल्यात मानेवर गंभीर दुखापत झाल्याने नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले आहे. सौरभ भिकाजी आळवेकर असे जखमी तरुणाचे नाव आहे. सदरचा विळा हल्ला सुशांत नितीन शिंदे याने केला असल्याचे आळवेकर यांनी पोलिसांना सांगितले. याबाबतचा अधिक तपास करवीर पोलिस करत आहेत.

पूर्ववैमनस्यातून तरुणावर विळ्याने हल्ला
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *