मुंबई

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त)

MahaNews LIVE
Jun 20 / 2018

20 जून 2018 1. राज्य पुरस्कृत फळबाग लागवड योजना राज्यात सुरू करण्यास मान्यता. 2. राज्यातील 145 मोठ्या बाजार समित्या राष्ट्रीय कृषि बाजार (ई-नाम) पोर्टलवर जोडण्याचा निर्णय. 3. कृषी उत्पन्न बाजार समितीमधील ई-ट्रेडिंगच्या नियमनासाठी महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम-1963 मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय. 4. पुणे जिल्ह्यातील गुंजवणी प्रकल्पांतर्गत धरण बांधून 21 हजार 392 हेक्टर क्षेत्रास बंद नलिकेद्वारे सिंचन देण्यासाठी 1313 कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता. 5. शिंगणापूर येथील श्री शनैश्वर देवस्थानचे व्यवस्थापन अधिक व्यापक, पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासह भक्तांसाठी उत्तम सोयी-सुविधा निर्माण करण्यासाठी स्वतंत्र कायदा. 6. दुय्यम न्यायालयातील न्याय‍िक अध‍िकारी, निवृत्तीवेतन व कुटुंब न‍िवृत्तीवेतनधारकांना दुसऱ्या राष्ट्रीय न्याय‍िक वेतन आयोगाच्या अंतर‍िम श‍िफारशी १ जानेवारी २०१६ पासून लागू करण्यास मान्यता. 7. बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्हा परिषदांमधील मारुफ करारातील 616 कर्मचाऱ्यांना कालेलकर करारातील तरतुदी लागू. 8. नागपूर जिल्ह्यातील काटोल नगर परिषदेच्या मंजूर विकास आराखड्यात क्रीडांगणासाठी आरक्षित आरक्षण क्र.24 वगळून रहिवास विभागात समाविष्ट करण्यास मान्यता. 9. महानगरपालिकेच्या मालकीच्या मालमत्तांसंदर्भातील निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम 79 (ड) मध्ये नवीन परंतुकाचा समावेश

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त)
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *